शाही बटाट्याचे कबाब: शाही बटाटाचे कबाब हे नाश्त्याला किंवा जेवणात तोंडी लावायला छान आहेत. बटाट्याचे कबाब बनवतांना आपण वेगवेगळ्या प्रकारचे सारण भरून बनवु शकतो. मी हे कबाब बनवतांना आवरण उकडलेल्या बटाट्याचे व सारण भरतांना हंगकर्ड म्हणजे चक्का वापरून चारोळी, बेदाणे, कांदा, आले, हिरवी मिरची, कोथंबीर, साखर व मीठ घालून सारण बनवले आहे. शाही कबाब चवीला टेस्टी लागतात टोमाटो सॉस बरोबर त्याची चव अप्रतीम लागते. बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट वाढणी: १० कबाब बनतात साहित्य : आवरणासाठी: ४ मोठे बटाटे (उकडून) १/२ कप बेसन १/२ टी स्पून गरम मसाला मीठ चवीने सारणासाठी: १ टे स्पून चारोळी ३ हिरव्या मिरच्या (चिरून) २ मोठे कांदे (चिरून) १ टी स्पून आले पेस्ट १ टे स्पून बेदाणे ३/४ कप चक्का १/४ कप कोथंबीर (चिरून) मीठ व साखर चवीने १ टे स्पून तेल तेल कबाब तळण्यासाठी Shahi Batata Kabab कृती: आवरणासाठी: बेसन थोडेसे भाजून घ्या. बटाटे उकडून, सोलून, किसून घ्या. मग त्यामध्ये भाजलेले बेसन, गरम मसाला, मीठ घालून मिक्स करून चांगले मळून घ्या. मग त्याचे १० एक सारखे गोळे बनवून घ्या. सारणासाठी: कांदे, कोथंबीर, हिरवी मिरची बारीक च्र्रून घ्या, आले वाटून घ्या. कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये चिरलेले कांदे, आले पेस्ट, हिरवी मिरची, चारोळी, बेदाणे घालून एक मिनिट मंद विस्तवावर परतून घेऊन, कढई विस्तवावरून खाली उतरवून घ्या. [...]
The post Shahi Batata Kabab Recipe in Marathi appeared first on Royal Chef Sujata.