पनीर स्वीट कॉर्न रोल: पनीर स्वीट कॉर्न रोल हे मुलांना किंवा मोठ्यांना सुद्धा नाश्त्याला किंवा जेवणात द्यायला छान आहेत. रोल बनवतांना दुधीभोपळा व दोडका किसून घेतला आहे. स्वीट कॉर्नचे दाणे उकडून घेतले आहेत. पनीर वापरले आहे जे सगळ्याच्या आवडीचे आहे. ह्या मध्ये मसाला काही वापरला नाही तसेच हे रोल पौस्टिक आहेत. The Marathi language version of the same recipe can be seen here – Paneer Corn Chapati Rolls बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: ८ रोल साहित्य: सारणासाठी: १ कप दुधीभोपळा किसून १ कप दोडका किसून १/२ कप स्वीट कॉर्न दाणे (उकडून) २०० ग्राम पनीर १ मध्यम आकाराचा कांदा १ मध्यम आकाराचा टोमाटो २ हिरव्या मिरच्या (चिरून) १ टे स्पून आले-लसूण पेस्ट १ टी स्पून लिंबूरस मीठ चवीने १ टे स्पून तेल आवरणासाठी: २ कप गव्हाचे पीठ २ टे स्पून बेसन १ टे स्पून तेल मीठ चवीने तूप रोल भाजण्यासाठी Paneer Sweet Corn Rolls कृती: आवरणासाठी: गव्हाचे पीठ, बेसन, तेल, मीठ व पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्या. मळलेले पीठ ३० मिनिट भाजुला ठेवून मग त्याचे आठ एक सारखे गोळे बनवा. सारणासाठी: दुधीभोपळा व दोडका सोलून किसून घ्या. मक्याचे दाणे उकडून घ्या. पनीरचे लहान तुकडे कापून घ्या. कांदा, टोमाटो बारीक चिरून घ्या. एका कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये कांदा, टोमाटो, आले=लसूण, [...]
The post Paneer Sweet Corn Rolls Recipe in Marathi appeared first on Royal Chef Sujata.