उपवासाचा बटाट्याचा चिवडा: उपवासाचा बटाट्याच्या चिवडा हा घरी बनवता येतो. हा चिवडा चवीला स्वादीस्ट लागतो. बटाट्याचा चिवडा बनवण्यासाठी बटाटे सोलून मोठ्या भोकाच्या किसणीने किसून घेतले आहेत. बटाटे किसून पाण्यात घालून त्यामध्ये १/४ टी स्पून सोडा घालावा त्यामुळे बटाट्याचा कीस हलका होतो. बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट वाढणी: १ किलो बनतो साहित्य: ८ मोठ्या आकाराचे बटाटे १ कप शेगदाणे १/४ कप काजू तुकडा १/२ कप बेदाणे १/२ कप पिठीसाखर मीठ चवीने तूप चिवडा तळण्यासाठी फोडणी करीता: २ टे स्पून तूप १ टी स्पून जिरे ६-७ हिरव्या मिरच्या Upvasacha Batata Chivda कृती: बटाटे धुऊन, सोलून मोठ्या भोकाच्या किसणीने किसून घ्या. एका मोठ्या आकाराच्या बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये सोडा घालून किसलेला बटाट्याचा कीस घालून हलवून पाणी काढून टाका. मग बटाट्याचा कीस स्वच्छ कापडावर ५-१० मिनिट पसरवून ठेवा. शेगदाणे भाजून व सोलून घ्या. हिरव्या मिरच्याचे तुकडे कापून घ्या. एका कढईमधे तूप गरम करून त्यामध्ये बटाट्याच्या कीस गुलाबी रंगावर कुरकुरीत तळून घेऊन पेपरवर ठेवा. मग भाजलेले शेगदाणे, बेदाणे व काजू तळून घ्या. मग सर्व मिक्स करून घ्या. फोडणी साठी तूप गरम करून घेऊन त्यामध्ये जिरे व हिरव्या मिरच्या घालून मिक्स करून फोडणी तळलेल्या कीसावर घालून मिक्स करून घ्या. मग वरतून मीठ व पिठीसाखर घालून हातानी मिक्स करून घ्या. चिवडा थंड झालाकी डब्यात भरून ठेवा.
The post Upvasacha Batata Chivda Recipe in Marathi appeared first on Royal Chef Sujata.