चिकन भुर्जी सॅन्डविच: चिकन भुर्जी सॅन्डविच हा एक सकाळी नाश्त्याला, दुपारी चहा बरोबर किंवा कोणी पाहुणे येणार असतील तर किंवा पार्टीला सुद्धा बनवण्यासाठी ही एक छान डीश आहे. चिकन भुर्जी बनवण्यासाठी बोनलेस चिकन वापरले आहे. माझ्या घरी पाहुणे आले तेव्हा मी सकाळी नाश्त्याला अश्या प्रकारचे सॅन्डविच बनवले होते ते सर्वांना खूप आवडले. The English language version of this recipe can be seen here – Spicy Chicken Sandwich बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: २५० ग्राम बोनलेस चिकन १ मोठ्या आकाराचा कांदा ८-१० लसूण पाकळ्या १” आले तुकडा १ मध्यम आकाराचा टोमाटो ३ हिरव्या मिरच्या १ टी स्पून लाल मिरची पावडर १ टी स्पून तंदुरी चिकन मसाला १/४ टी स्पून हळद १/४ कप कोथंबीर १ टे स्पून तेल मीठ व लिंबूरस चवीने १० ब्रेड स्लाईस Chicken Bhurji Sandwich कृती: चिकनचे तुकडे धुवून, शिजवून घ्या. चिकन शिजल्यावर त्याचे उभे पातळ काप चिरून घ्या. कांदा, आले, लसूण, हिरवी मिरची, टोमाटो, कोथंबीर चिरून घ्या. एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये चिरलेला कांदा, आले-लसूण, हिरवी मिरची घालून २-३ मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या. मग त्यामध्ये चिरलेला टोमाटो, हळद, लाल मिरची पावडर व मीठ घालून १ मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या. मग चिरलेले चिकन, कोथंबीर २ टे स्पून पाणी घालून २-३ मिनिट मंद विस्तवावर [...]
↧