सोया कटलेट्स: सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आहेत. तसेच विटामीन, विटामीन-ए व बी, खनिजपण आहेत. आपल्याला माहीत आहे का सोयाबीन मध्ये नॉनव्हेज पेक्षा जास्त प्रोटीन आहेत. सोयाबीनच्या सेवनाने उच्च रक्तदाब, हृदयासाठी व ज्यांना मधुमेह आहे त्यांना हे खूप गुणकारी आहे. सोया कटलेट बनवण्यासाठी मी सोया चक वापरले आहेत व बटाटे वापरण्याच्या आयवजी चणाडाळ वापरली आहे. हे कटलेट बनवायला सोपे आहेत व सगळ्यांना नक्की आवडतील. The English language version of this Cutlets Recipe can be seen here – Healthy and Delicious Soya Beans Cutlets बनवण्यासाठी वेळ: ५० मिनिट वाढणी: १५-१८ साहित्य: १ कप चणाडाळ ३/४ कप सोया चंक ३ कप पाणी १ मध्यम आकाराचा कांदा १ टे स्पून आले-लसूण पेस्ट ३ हिरव्या मिरच्या (चिरून) १/४ कप कोथंबीर (चिरून) १/४ कप पुदिना पाने (चिरून) १ टे स्पून तेल मीठ चवीने तेल कटलेट शालो फ्राय करण्यासाठी २-३ ब्रेड स्लाईस Soya Beans Cutlets कृती: चणाडाळ धुवून ३० मिनिट भिजत ठेवा, मग प्रेशर कुकरमध्ये भिजवलेली चणाडाळ व सोय चंक थोडेसे कुटून घालावे व ३ कप पाणी घालून डाळ चांगली ८-१० मिनिट मध्यम आचेवर शिजवून घ्यावी. हिरवी मिरची, कोथंबीर, पुदिना चिरून घ्या. चणाडाळ शिजली की बाजूला काढून थंड करायला ठेवा मग मिक्सरमध्ये वाटून घ्या. एका कढई मध्ये १ टे स्पून तेल गरम करून चिरलेला कांदा, आले-लसूण-हिरवी मिरची [...]
↧