सकाळ टाईम्स, पुणे यांच्या तर्फे श्री जाधव व त्यांचे सहकारी यांनी शनिवार दिनांक २६ मे २०१८ रोजी यश रवीपार्क कॉप हौसिंग सोसायटी ली. हांडेवाडी, हडपसर, पुणे ह्याच्या क्लब हाऊस मध्ये संध्याकाळी ६:०० वाजता महिलांकरीता पाककला स्पर्धा व लहान मुलांनकरीता नृत्य स्पर्धा आयोजित केली होती. सकाळ न्यूजपेपर समुह नेहमी वेगवेगळ्या स्पर्धाचे आयोजन करीत असतात. त्यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढतो व आपण काहीतरी वेगळे करून दाखवावे असे वाटते. सकाळ टाईम्स यांनी पाककला व नृत्य स्पर्धा ह्याचे नियोजन खूप छान केले होते. स्पर्धे साठी जवळ जवळ ५० जणींनी भाग घेतला होता. ज्या महिलांनी स्पर्धे मध्ये भाग घेतला होता त्यानी खूप कष्ट करून नाविन्यपूर्ण पदार्थ बनवले होते. परत ह्या स्पर्धेमध्ये पूर्ण भारत पाहायला मिळाला. कारण की ह्या सोसायटीमध्ये अनेक प्रांताचे रहिवाशी राहतात व स्पर्धे मध्ये ज्या महिलांनी भाग घेतला होता त्यांनी आपापल्या प्रांताचे लोकप्रिय पदार्थ बनवले होते. सकाळ समूहाच्या टीमने ह्या स्पर्धेसाठी खूप कष्ट घेतले होते. Sakal Times Cooking Competition Sakal Times Ladies Cooking Competition Yash Ravi Park Cooking Competition Prize Distribution Yash Ravi Park Cooking Competition Food Display Sakal Times Report लहान मुलांसाठी नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ह्या स्पर्धेमध्ये सुद्धा बऱ्याच लहान मुलांनी भाग घेतला होता. ज्या छोट्या मुलीला पहिले पारितोषिक मिळाले तिने प्लास्टिक पिशव्या किती घातक आहेत व त्याचा वापर करू [...]
↧