सकाळ टाईम्सची हडपसर डॉक्टर असोसिएशनकरीता अनोखी पाककला स्पर्धा दिनांक ३ रोजी संध्याकाळी ५ वाजता रविवार ह्या दिवशी आयोजित केली होती. पाककला स्पर्धेचे नियोजन श्री जाधव, हडपसर विभागाचे पत्रकार श्री जगदाळे, श्री वाघ यांनी खूप छान केले होते. श्री शिंदे यांनी अँकरिंग खूप छान केले होते. आता परंत पहिल्यांदाच फक्त डॉक्टरांनकरीता पाककला स्पर्धा आयोजिली होती. ह्या स्पर्धे मध्ये ५० डॉक्टरांनी सहभाग घेतला होता तसेच विशेष म्हणजे महिला डॉक्टरांन बरोबर काही पुरुष डॉक्टरांनी सुद्धा सहभाग घेतला होता. अश्या ह्या अनोख्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या डॉक्टरांनी नानाविध पौस्टिक पदार्थ बनवले होते. डॉक्टर म्हंटले की व्हीटामीन,प्रोटीन व आपल्या शरीराला लागणाऱ्या आवशक घटकांचा विचार करून पदार्थ बनवले होते. Doctors Cooking Competition in Hadapsar Sakal Times Doctors Cooking Competition in Hadapsar Sakal Times Doctors Cooking Competition Food Display डॉक्टर म्हंटले की आपल्या डोळ्या समोर त्यांचे बिझी शेड्युल व त्याच्या अवती भोवती पेशंट असलेले दिसतात त्यांना कधी वेळ मिळत नाही पण ह्या स्पर्धेमध्ये त्यानी वेळ काढून सहभाग घेऊन पौस्टिक पदार्थ सुद्धा बनवले होते. सकाळ टाईम्सच्या नियोजकांनी डॉक्टरांनच्या पाककला स्पर्धे साठी तीन भाग केले होते. एक भाग म्हणजे मिष्टान्न, दुसरा भाग पौ स्टिक, तिसरा व्हेज-नॉनव्हेज व चौथा झटपट रेसिपी असे होते. मिष्टान्नमध्ये मँगोकेक, ब्राऊनी, मँगो न्युडल्स ड्रायफ्रुट खीर असे काही पदार्थ होते. पौस्टिक मध्ये गव्हाचे मोदक, व्हेज बिर्याणी, थालीपीठ, [...]
↧