मँगो पुडींग जार : मँगो पुडींग जार ही एक जेवणा नंतरची एक डेझर्ट रेसिपी आहे. आंबा म्हंटले की लहान मुलांना व मोठ्यांना सुद्धा खूप आवडतो. उन्हाळा आला की आंब्याचा सीझन चालू होतो. आपण आंब्याचे नानाविध पदार्थ बनवत असतो. मँगो आईसक्रिम, लस्सी, जूस, बर्फी अशे वेगवेगळे पदार्थ बनवत असतो. मँगो पुडींग जार ही एक खूप टेस्टी डीश आहे. करून बघा सगळ्यांना खूप आवडेल. पण ही सर्व्ह करताना छान थंड झाले पाहिजे. बनवण्यासाठी वेळ: १५ मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: ४ हापूस मोठ्या आकाराचे आंबे ४ केकचे गोल तुकडे १ टे स्पून साखर ड्राय फ्रुट सजावटीसाठी १ मोठा आंबा सजावटीसाठी बर्फाचे तुकडे Mango Pudding Jar कृती: आंब्याचा रस काढून त्यामध्ये साखर घालून मिक्सरमधून काढा. केकचे उभे गोल तुकडे कापून घ्या. दुसऱ्या एका आंब्याचे पातळ उभे पीस सजावटीसाठी कापून घ्या. एक डेकोरेटीव्ह ग्लास घेऊन त्यामध्ये थोडा आंब्याचा पल्प घालून मग एक केकचा उभा पीस ठेऊन परत आंब्याचा पल्प घालून बर्फाचे तुकडे टाका. मग वरती आंब्याचे पातळ उभे पीस ठेवून सजवून ड्राय फ्रुटचे तुकडे घालून सजवा. आंब्याचे पुडींग जार फ्रीजमध्ये २-३ तास थंड करायला ठेवा. मग थंड गार मँगो पुडींग जार सर्व्ह करा.
↧