तीनरंगी रवा-नारळ बेक करंजी: आज कालच्या लाईफ स्ताईल मध्ये बराच फरक झाला आहे. एक म्हणजे आजकाल सगळे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप चोखादनल झाले आहेत. आज काल तेल,तूप, साखर, मसालेदार खाणे बरेच कमी झाले आहे. बेक करंजी ही सुद्धा छान लागते. ह्या मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे सारण भरून बनवू शकतो. बेक करंजी बनवतांना ओल्या नारळाचे सारण बनवले आहे. नारळ, दुध व साखर आटवून घेवून सारण बनवले आहे. आवरणा करीता रवा वापरला आहे. तसेच ह्या करंज्या पुडाच्या करंज्या सारख्या किंवा layered Karanjee सारख्या बनवल्या आहेत. बेक करंज्या चवीला छान लागतात. तीनरंगी रवा-नारळ बेक करंजी ह्या दिवाळीच्या फराळाकरीता बनवा खूप छान दिसेल व चवीस्ट सुद्धा लागेल. The English version of this Karanji Recipe can be seen here – Tricolor Baked Karanji बनवण्यासाठी वेळ: ९० मिनिट वाढणी: १८-२० साहित्य: सारणाकरीता: १ मोठ्या आकाराचा नारळ (खोवून) १/२ लिटर दुध (म्हशीचे) १/२ कप साखर १ टी स्पून वेलचीपूड ८-१० बदाम (थोडे बारीक करून) ८-१० काजू (थोडे बारीक करून) २ टे स्पून बेदाणे आवरणाकरीता: २ कप रवा (बारीक) १/२ कप तूप १ टी स्पून बेकिंग पावडर १/४ कप दुध मीठ चवीने २-२ थेंब खाण्याचा रंग (हिरवा, ऑरेंज किंवा पिवळा) साठ्यासाठी: ४ टे स्पून कॉर्नफ्लोर ४ टे स्पून तूप/ वनस्पती तूप Tirangi Rava Naral Baked Karanji कृती: सारणा [...]
↧