रेड रोज मिल्क मस्तानी: मस्तानी हे एक पुण्यातील लोकप्रिय ड्रिंक आहे. आपण नेहमी आंबा मस्तानी बनवतो. मला एक कल्पना सुचली व मी रेड रोज मिल्कशेक मस्तानी बनवून बघितली, जेव्हा बनवलेली मस्तानी टेस्ट केली तेव्हा चवीला अप्रतीम लागली. आपण मस्तानी बनवतांना वेगवेगळ फ्लेव्हर बनवू शकतो. मस्तानी हे ड्रिंक प्रथम पुण्यामध्ये बनवायचे सुरु झाले व बघता बघता खूप लोकप्रिय झाले. मस्तानी हे दुधापासून बनवले आहे. ह्यामध्ये दुध व रेड रोज सिरप मिक्स करून मिक्सरमध्ये ब्लेंड करून घेतले, आईसक्रिम बनवून ठेवले होते. मस्तानी ड्रिंक हे सर्व्ह करतांना डेकोरेटीव्ह ग्लासमध्ये करावे म्हणजे खूप आकर्षक दिसते व ग्लास मध्ये आपल्याला स्टेप बाय स्टेप डेकोरेट सुद्धा करता येते. मस्तानी सर्व्ह करताना सब्जा बी सुद्धा वापरले आहे. सब्जा बी प्रथम पाण्यात भिजवून घेतले होते. मग ग्लास मध्ये दिसायला पण छान दिसते. The English language recipe of this Milkshake can be seen here – Popular and Famous Red Rose Mastani Milkshake बनवण्यासाठी वेळ: १० मिनिट थंड करण्यासाठी वेळ: २ तास वाढणी: २ जणासाठी साहित्य: २ कप दुध २ टे स्पून रेड रोज सिरप २ स्कूप व्ह्नीला आईसक्रिम किंवा रोज आईसक्रिम बर्फाचे तुकडे सजावटीसाठी: १ टे स्पून ड्राय फ्रुट (बदाम,काजू, पिस्ते तुकडे करून) २ टे स्पून रेड रोज सिरप १ टे स्पून सब्जा बी (भिजवून) Pune’s Red Rose Milk [...]
↧