ज्वारीच्या पीठाचे डोसे: ज्वारीच्या पीठाचे डोसे ही एक नाश्त्याला किंवा जेवणात सुद्धा बनवू शकतो. लहान मुले भाकरी खायचा कंटाळा करतात किंवा त्यांना ती आवडत नाही. ज्वारीमध्ये पोषक घटक व चरबीचा भाग असतो. ज्वारीही थंड व रुक्ष असल्याने वायुकारक असते. तसेच तिचा वापर रोजच्या जेवणात केल्याने टी आरोग्य कारक असते. ज्वारी ही थंड ,रुक्ष , मधुर, पिक्तशामक रक्तविकार, दूर करणारी आहे. The English language version of this Dosa Recipe can be seen here – Crispy Millet Flour Dosa बनवण्यासाठी वेळ: ४० मिनिट वाढणी ४ जणासाठी साहित्य: २ कप ज्वारीचे पीठ १ कप तांदळाचे पीठ १/२ कप बारेक रवा ४ हिरव्या मिरच्या १” आले तुकडा १ टी स्पून जिरे १/४ कप कोथंबीर (चिरून) मीठ चवीने तेल डोसा भाजण्यासाठी Jowar Chya Pithacha Dosa कृती: ज्वारीचे पीठ, तांदळाचे पीठ, रवा,मीठ व पाणी घालून भजाच्या पीठा सारखे भिजवून ३० मिनिट झाकून बाजूला ठेवा. हिरवी मिरची, आले, जिरे बारीक वाटून घ्या. कोथंबीर बारीक चिरून घ्या. ज्वारीच्या भिजवलेल्या पिठात वाटलेले आले-हिरवी मिरची व कोथंबीर घालून मिक्स करून घ्या. नॉनस्टिक तवा गरम करून त्यावर एक टी स्पून तेल लावून १/२ कप भिजवलेले पीठ घालून तव्यावर पसरवून घ्या. बाजूनी थोडेसे तेल सोडा. डोसा दोनी छान भाजून घ्या. गरम गरम डोसा पुदिना चटणीबरोबर सर्व्ह करा. पुदिना चटणी रेसिपी इथे पहा- [...]
↧