होममेड एगलेस कोकनट बिस्कीट: होममेड एगलेस कोकनट बिस्कीट हे बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहेत. कोकनट बिस्कीट बनवण्यासाठी मैदा, थोडे बटर अथवा वनस्पती तूप, व्ह्ननीला इसेन्स, डेसिकेटेड कोकनट वापरले आहे. कोकनट बिस्कीट आपण चहा बरोबर सुद्धा सर्व्ह करू शकतो. ही बिस्कीट चवीला खूप छान लागतात. ही बिस्कीट बनवतांना अंडे वापरले नाही. कोकनट बिस्कीट बनवतांना मी वनस्पती तूप व बटर निम्मे-निम्मे असे प्रमाण घेतले आहे. बनवण्यासाठी वेळ ६० मिनिट वाढणी: ३० बिस्कीट बनतात साहित्य: १ १/२ कप मैदा ३/४ कप पिठीसाखर १ कप वनस्पती तुप/ तेल/ बटर १ टी स्पून बेकिंग सोडा १/४ टी स्पून व्हनीला इसेन्स १/४ कप डेसिकेटेड कोकनट २ टे स्पून डेसिकेटेड कोकनट सजावटीसाठी Homemade Eggless Coconut Biscuits कृती: प्रथम मैदा व बेकिंग पावडर मिक्स करून चाळून घेवून बाजूला ठेवा. एका मोठ्या बाउलमध्ये तूप/ तेल/ बटर व पिठीसाखर घेवून मिश्रण चांगले हलके होईस परंत फेटून घ्या. मग त्यामध्ये चाळलेला मैदा, व्हनीला इसेन्स, डेसिकेटेड कोकनट मिक्स करून हलक्या हातानी मळून घ्या. मग मळलेल्या पीठाचे एक सारखे दोन गोळे बनवून घ्या. एक गोळा पोळपाटावर जाडसर लाटून घेऊन त्याचे एक सारखी गोल आकाराची बिस्कीट कापून घ्या. प्रतेक बिस्कीटवर वरच्या बाजूस डेसिकेटेड कोकनट लावून घेवून एका नॉन स्टिक माईक्रोवेव प्लेट मध्ये सर्व बिस्कीट मांडून घ्या. माईक्रोव्हेव ओव्हन आधी कन्वेक्शन मोडवर प्रीहीट [...]
↧