होममेड शेवई बिर्याणी: होममेड शेवई बिर्याणी याला आपण न्युडल्स बिर्याणी सुद्धा म्हणू शकतो. ही एक न्युट्रीशीयस डीश आहे कारणकी ह्या मध्ये हात शेवया वापरल्या आहेत त्या गव्हाच्या रव्या पासून बनवल्या जातात. तसेच ह्यामध्ये भाज्या सुद्धा वापरल्या आहेत ही एक निराळीच डीश आहे. आपण जेवणात व मुलांना शाळेत जातांना डब्यात सुद्धा देवू शकतो. बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: २०० ग्राम शेवया किंवा बॉम्बीनो शेवया किंवा ४ कप शेवया १ मध्यम आकाराचा कांदा (उभा पातळ चिरून) १ मध्यम आकाराचा कांदा (उभा पातळ चिरून तळून) १ छोटा बटाटा ४-५ फ्रेंच बीन्स (तिरक्या चिरून) १ छोटी शिमला मिर्च (चिरून) १ छोटे गाजर (चिरून) १ कप कोबी (उभा पातळ चिरून) १ टे स्पून हिरवे मटार १ टी स्पून गरम मसाला मीठ चवीने तेल कांदा तळण्यासाठी १ टे स्पून तूप शेवया भाजण्यासाठी फोडणी करीता: १ टे स्पून तेल ५-६ काळे मिरे २-३ हिरवे वेलदोडे १ तमालपत्र २ लवंग Homemade Sevai Biryani कृती: कांदा उभा पातळ चिरून ब्राऊन रंगावर कुरकुरीत तळून घ्या व बाजूला ठेवा. भाज्या चिरून घ्या. कांदा उभा चिरून घ्या. कढई मध्ये तूप गरम करून शेवया गुलाबी रंगावर भाजून प्लेटमध्ये काढून घ्या. कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये मिरे, वेलदोडे, तमालपत्र, लवंग घालून उभा चिरलेला कांदा घालून थोडासा परतून घ्या. मग त्यामध्ये चिरलेल्या [...]
↧