Quantcast
Channel: royalchef.info
Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Cauliflower Potato Soup Recipe in Marathi

$
0
0
कॉलीफ्लावर-पोटँटो सूप: कॉलीफ्लावर- पोटँटो सूप हे पौस्टिक तर आहेच कारण ह्या मध्ये आपल्या आरोग्यासाठी जी प्रोटीन, कॅल्श‌यिम, सोडीयम, पोटॅशियम, लोह. जीवनसत्व “ए” , “बी” व “सी” असते. तसेच मुले कॉलीफ्लावर खाण्याचा कंटाळा करतात त्यामुळे सूप बनवले तर त्यांना नक्की आवडेल. बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: २५० ग्राम कॉलीफ्लावर ३ मध्यम आकाराचे बटाटे १ मोठा कांदा (चिरून) २ मध्यम आकाराची गाजर ४ कप व्हेजीटेबल स्टॉक १ टी स्पून गरम मसाला १ टी स्पून लसून (चिरून) १ टी स्पून धने पावडर १/२ टी स्पून हळद १ टी स्पून जिरे पावडर १ टी स्पून मिरे पावडर मीठ चवीने आवशकता भासल्यास अजून व्हेजीटेबल स्टॉक वापरणे. Cauliflower Potato Soup कृती: कॉलीफ्लावर स्वच्छ धुवून त्याचे तुरे कापून घ्या. बटाटे सोलून धुवून त्याचे चौकोनी तुकडे करून घ्या. एका मोठ्या आकाराच्या भांड्यात वरील सर्व साहित्य एकत्र करून, भाज्या बुडेल एव्ह्डे पाणी घालून १५-२० मंद विस्तवावर शिजवून घ्या.मग भाज्या थोड्या थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. त्यामध्ये व्हेजीटेबल स्टॉक मिक्स करून कॉलीफ्लावर- पोटँटो सूप गरम करून घ्या. गरम गरम कॉलीफ्लावर- पोटँटो सूप सर्व्ह करा. सर्व्ह करताना कोथंबीर घालून सजवा.

Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Trending Articles