Quantcast
Channel: royalchef.info
Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Hot and Refreshing Rasam Recipe in Marathi

$
0
0
गरमागरम रसम: रसम हे एक चटपटीत गरमागरम पेय आहे. ह्याला सूप म्हंटले तरी चालेल. रसम हे भारतातील दक्षिण भागात लोकप्रिय आहे. पावसाळा किंवा हिवाळा ह्या ऋतू मध्ये मुद्दाम बनवतात, जे सर्दी झाली असेलतर तर जरूर ह्याचे सेवन करावे घशाला छान शेक बसतो. अश्या प्रकारचे रसम सोप्या पद्धतीने बनवले आहे ते आपण माईकोवेव मध्ये सुद्धा बनवू शकतो. बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: १ टे स्पून चिंच कोळ १ टे स्पून गुळ १ कप पाणी फोडणी करीता: २ टी स्पून तेल ४ लसून पाकळ्या (ठेचून) १/२ टी स्पून मोहरी १ छोटा कांदा (चिरून) २ लाल सुक्या मिरच्या (दोन तुकडे करून) ८-१० कडीपत्ता पाने ५-६ काळी मिरी १/२ टीस्पून हळद मीठ चवीने Hot and Refreshing Rasam कृती: प्रथम एका मध्यम आकाराच्या भांड्यात चिंच, गुळ व एक कप पाणी मिक्स करून एक उकळी आणून बाजूला ठेवा. कांदा बारीक चिरून घ्या. मिरचीचे दोन तुकडे करा. दुसऱ्या एका भांड्यात तेल गरम करून लसून, मोहरी, कांदा, लाल मिरची, कडीपत्ता, काळी मिरी, हळद, मीठ घालून फोडणी तयार झाली की त्यामध्ये ४ ग्लास पाणी घालून चांगली उकळी येवू द्या. मग रसम गाळून ग्लास मध्ये गरम गरम सर्व्ह करा.

Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Trending Articles