Quantcast
Channel: royalchef.info
Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Nourishing Cheese Chicken Soup Recipe in Marathi

$
0
0
चीज चिकन सूप: चीज चिकन सूप चवीला टेस्टी आहे तसेच बनवायला सोपे व झ्त्पे होणारे आहे. सूप बनवतांना प्रथम चिकन स्टॉक बनवून घ्या. चिकन सूप हे लहान मुलांना किंवा आजारी माणसांना द्यायला चांगले आहे. पावसाळ्याच्या किंवा थंडीत सुद्धा बनवायला छान आहे. बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: ४ कप चिकन स्टॉक २ टे स्पून चीज (किसून) १ छोटा कांदा (चिरून) २ टे स्पून कॉर्न फ्लोर १ टी स्पून बटर २ मोठे चिकनचे तुकडे २ कप दुध मीठ चवीने Nourishing Cheese Chicken Soup कृती: एका जाड बुडाच्या भांड्यात ६ कप पाणी व चिकनचे तुकडे घालून १०-१२ मिनिट शिजवून घ्या. पाणी थोडे आटले पाहिजे म्हणजे ४ कप पाणी झाले पाहिजे आव्ह्डे आटवायचे (हा चिकन स्टॉक तयार झाला) एका जाड बुडाच्या भांड्यात बटर गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या.. मग त्यामध्ये चिकनचे उकललेले पाणी घालून एक उकळी आलीकी पाणी गाळून घ्या. चिकनचे पाणी परत मंद विस्तवावर ठेवा. एका बाउलमध्ये कॉर्न फ्लोर व थोडे पाणी घालून मिक्स करून चिकनच्या पाण्यात मिक्स करून मंद विस्तवावर ठेवून सारखे हालवत रहावे. मिश्रणाला उकळी आली की त्यामध्ये दुध, चिकनचे शिजवलेले तुकडे, किसलेले चीज घालून मिक्स करून मंद विस्तवावर ४-५ मिनिट शिजू द्यावे. चवीनुसार मीठ घालावे. पण सतत हलवत राहवे नाहीतर कॉर्न फ्लोर [...]

Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Trending Articles