नाचणी गुळाचे लाडू: नाचणी ही आपल्या आरोग्यासाठी थंड आहे. त्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे. लहान मुलांना नाचणीचे लाडू द्यायला अगदी पौस्टिक आहेत, तसेच लाडू बनवताना गुळ वापरला आहे त्यामुळे गुळ तर आपल्या आरोग्यासाठी खूप औषधी आहे. बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट वाढणी: १५-१७ लाडू साहित्य: २ कप नाचणी १/४ कप साजूक तूप १/४ कप पिठीसाखर १/४ कप सुके खोबरे १ कप गुळ (किसून) १/४ कप ड्राय फ्रुट १/२ कप दुध १ टी स्पून वेलचीपूड Nachni Gulache Ladoo कृती: प्रथम नाचणी मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. गुळ किसून बाजूला ठेवा. सुके खोबरे किसून भाजून घ्या. एका मध्यम आकारच्या कढईमधे तूप गरम करून त्यामध्ये बारीक केलेली नाचणी घालून मिक्स करून मंद विस्तवावर ८-१० मिनिट खमंग भाजून घ्या. मधून मधून सारखे हलवत राहा नाहीतर नाचणीचे पीठ जळून लाडवाला करपट वास येईन. नाचणीचे पीठ भाजून झाले की त्यामध्ये दुधाचा हबका मारून मिक्स करून विस्तव बंद करून मिश्रण चांगले ढवळून घ्या. भाजलेले मिश्रण परातीत काढून घेऊन कोमट असतांना पिठीसाखर, गुळ, वेलचीपूड, ड्रायफ्रुट, भाजलेले सुके खोबरे घालून चांगले मिक्स करून घ्या. मळलेल्या मिश्रणाचे मध्यम आकाराचे लाडू वळून घ्या.
↧