चिकन स्वीट कॉर्न सूप: हे सूप बनवतांना चिकनचे तुकडे व स्वीट कॉर्न वापरले आहे. हे सूप जर अशक्तपणा आला असेलतर खूप आरोग्यदाई आहे. बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहे. चिकन स्वीट कॉर्न सूप बनवतांना चिकनचा स्टॉक वापरला आहे. बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट वाढणी: ४ जनासाठी साहित्य: १ मध्यम आकाराचे स्वीट कॉर्न (किसून) ४ मोठे चिकनचे तुकडे १ छोटा कांदा (चिरून) १ टी स्पून आले (किसून) १ टी स्पून लसून (बारीक चिरून) १ टी स्पून सोय सॉस १ टी स्पून काळी व पांढरी मिरी पावडर १ टी स्पून पांढरे व्हेनिगर २ टे स्पून कॉर्न फ्लोर १ टे स्पून बटर, मीठ चवीने Chicken Sweet Corn Soup कृती: प्रथम एका जाड बुडाच्या भांड्यात ६ कप पाणी, १ छोटा कांदा, थोडीशी कोथंबीर, थोडेसे मीठ व चिकनचे तुकडे घालून ५ -७ मिनिट मध्यम विस्तवावर शिजवून घ्या. (हा चिकनचा स्टॉक तयार झाला) चिकनचे तुकडे बाजूला काढून ठेवा. स्वीट कॉर्न कणीस किसणीवर किसून घ्या. एका बाउल मध्ये कॉर्नफ्लोर व थोडेसे पाणी घालून मिक्स करून घ्या. अंडे फोडून अंड्याचा फक्त पांढरा भाग घेवून काटे चमच्यानी फेटून घ्या. प्रेशर कुकर मध्ये बटर गरम करून कांदा थोडा गुलाबी रंगावर परतून घ्या. मग त्यामध्ये आले-लसून घालून थोडे परतून घेवून मग त्यामध्ये किसलेले स्वीट कॉर्न घालून २ कप पाणी घालून एक [...]
↧