आईस लेमन टी: आपल्याकडे चहाचे शोकीन बरेच आढळतात. ज्यांना चहा खूप आवडतो त्यांना हा आईस लेमन टी खूप आवडतो, हा चहा एकदम ताजेतवाने करतो कारण ह्यामध्ये लिंबूरस घातल्यामुळे थोडा आंबट लागतो त्यामुळे आपल्या नेहमीच्या चहा पेक्षा खूप चवीस्ट लागतो. नाश्त्या बरोबर हा चहा मस्त लागतो. पण हा चहा थंड आहे त्यामुळे आपण जेव्हा गर्मी असते तेव्हा बनवतात पण काही जणांना हा चहा कधी पण घेतला तरी चालतो. बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट वाढणी: ४ कप साहित्य: ४ कप पाणी ४ टी स्पून चहा पावडर ४ टी स्पून लिंबूरस ८ टी स्पून साखर १०-१२ बर्फाचे तुकडे १०-१२ पुदिना पाने १ छोटे लिंबू (उभे पातळ चकती सारखे कापून) Iced Lemon Tea कृती: एका भांड्यात ४ कप पाणी गरम करून घ्या मग त्यामध्ये चहा पावडर, पुदिना पाने, साखर घालून २ मिनिट चहा उकळून घेवून एका दुसऱ्या भांड्यात गाळून थंड करायला ठेवा. चहा थंड झाल्यावर त्यामध्ये लिंबूरस व अजून साखर पाहिजे असेलतर घालून मिक्स करून घ्या. सर्व्ह करताना चहा काचेच्या ग्लास मध्ये ओतून त्यामध्ये बर्फ, पुदिना पाने व लिंबाची एक चकती घालून सजवून सर्व्ह करा.
↧