Quantcast
Channel: royalchef.info
Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Healthy Ayurvedic Tea Recipe in Marathi

$
0
0
आयुर्वेदिक टी: अश्या प्रकारचा चहा बनवताना जिरे, धने, व बडीशेप वापरले आहे. आयुर्वेदिक टी हा आपण रोज सकाळी घेण्याची सवय केली तर आपले शरीर आतून व बाहेरून निरोगी राहू शकते. त्यामुळे शरीरातील विषारी घटक निघून जातील व आपले शरीर निरोगी बनेल. व आपली रोग प्रतिकारशक्ती सुद्धा वाढेल.धने-जिरे व बडीशेप ह्यामध्ये असे गुणधर्म आहेत की आपल्या शरीरातील नको असलेले घटक निघून आपले पोट साफ होईल. तसेच आपल्याला वजन कमी करण्यात सुद्धा मदत मिळेल. अजून ह्याचा एक फायदा म्हणजे धने-जिरे वापरून बनवलेले पाणी आपल्या रक्तातील कोलेस्ट्रॉल सुद्धा कमी होते. बनवण्यासाठी वेळ: १० मिनिट वाढणी: २ जणासाठी साहित्य: २ कप पाणी १/४ टी स्पून जिरे १/४ टी स्पून धने १/४ टी स्पून बडीशेप Healthy Ayurvedic Tea कृती: एका भांड्यात २ कप पाणी गरम करायला ठेवा. पाणी गरम झाले की त्यामध्ये धने-जिरे व बडीशेप घालून ५ मिनिट गरम करायला ठेवा. मग विस्तव बंद करून चहा गाळून मग सर्व्ह करा.

Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Latest Images

Trending Articles



Latest Images