अमृततुल्य चहा: अमृततुल्य चहा हा पुण्यात खूप लोकप्रिय आहे. आपल्याला ठीक ठिकाणी अमृततुल्य चहाची दुकाने दिसतात. हा चहा थोडा दाट म्हणजेच घट्ट असून थोडा गोड असतो. ह्यामध्ये दुध, सोसायटी टी, चहाचा मसाला, साखर सुद्धा नेहमी पेक्षा जास्त असते. अश्या प्रकारचा एक कप चहा घेतला तरी छान फ्रेश वाटते. बनवण्यासाठी वेळ: १० मिनिट वाढणी २ कप साहित्य: १ कप दुध १ कप पाणी ५ टी स्पून साखर १ ती स्पून चहा मसाला ३ टी स्पून सोसायटी चहा पावडर Typical Amrutulya Chai कृती: प्रथम एका भांड्यात दुध व पाणी मिक्स करून विस्तवावर गरम करायला ठेवा मग त्यामध्ये चहा मसाला, साखर, चहा पावडर घालून चांगला उकळून घ्या. गरम गरम अमृततुल्य चहा बिस्कीट बरोबर किंवा बन बरोबर सर्व्ह करा.
↧