Quantcast
Channel: royalchef.info
Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Tasty Mint Tea Recipe in Marathi

$
0
0
मिंट टी: पुदिन्याची आपण चटणी बनवतो. तसेच त्याचा चहा पण चवीस्ट लागतो. हा चहा बनवताना पुदिना पाने, मिरे व काळे मीठ वापरले आहे. पुदिन्यामध्ये विटामिन “ए” “बी” “सी” तसेच आयर्न, कैल्शियम हे अधिक प्रमाणात असते. पुदिना, मिरे व काळे मीठ वापरून बनवलेल्या चहाच्या सेवनाने पोट साफ होऊन, पोटातील रोग दूर होण्यास मदत होते. पचनशक्ती सुधारते. चेहऱ्यावरील पिंपल ठीक होतात, आपली त्वचा थंड रहाते व उजळून येते. एलर्जी कमी होते. पचनशक्ती सुधारून वजन कमी होते. हा चहा खूप गुणकारी आहे, आपण पाहिजेतर ह्यामध्ये साखर व दुध वापरू शकतो पण मग तो नेहमी सारखा चहा होईल. बनवण्यासाठी वेळ: १० मिनिट वाढणी: २ कप साहित्य: २ कप पाणी १/२ टी स्पून मिरे (जाडसर कुटून) १/२ टी स्पून काळे मीठ १०-१२ पुदिना पाने Tasty Mint Tea कृती: प्रथम पुदिना पाने स्वच्छ धुवून घ्या. एका भांड्यात दोन ख पाणी गरम करायला ठेवून त्यामध्ये पुदिना पाने, मिरे, काळे मीठ घालून ५-७ मिनिट मंद विस्तवावर चहाला उकळी येऊ द्या. मग एका काचेच्या ग्लासमध्ये चहा गाळून सर्व्ह करा.

Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Trending Articles