खमंग कॉलीफ्लॉवर पुलाव: आपण नेहमी वर्ण-भात, आमटी-भात बनवतो. कॉली फ्लॉवर पुलाव हा आपण जेवणात वेगळेपण म्हणून बनवता येतो. कॉली फ्लॉवर पुलाव हा चवीला छान लागतो. लहान मुलांना नक्की आवडेल. हा पुलाव बनवतांना कॉली फ्लॉवरचे तुरे हळद-मीठ लाऊन तळून घेतले आहेत. त्यामुळे कॉली फ्लॉवरचा उग्र दर्प येत नाही. बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: २ कप तांदूळ (बासमती किंवा दिल्ली राईस) १ कप कॉली फ्लॉवरचे तुरे १ टी स्पून लिंबूरस २ टे स्पून कोथंबीर पाने (चिरून) मीठ चवीने मसाला पुलावासाठी: १ मध्यम आकाराचा कांदा १ टे स्पून आले-लसूण पेस्ट ३ हिरव्या मिरच्या पेस्ट १ टी स्पून लाल मिरची पावडर १/४ टी स्पून हळद १/४ टी स्पून धने-जिरे पावडर १ टी स्पून गरम मसाला किंवा बिर्याणी मसाला फोडणीसाठी: १ टे स्पून तेल ४ लवंग ३ हिरवे वेलदोडे २ तमलपत्र १/२” दालचीनी तुकडा १ टी स्पून शहाजिरे १/४ कप तेल कॉलीफ्लॉवर तळण्यासाठी Cauliflower Pulav or Rice कृती: तांदूळ धुवून २० मिनिट बाजूला ठेवा. कॉलीफ्लॉवरचे तुरे धुवून त्याला हळद-मीठ लावून ५ मिनिट बाजूला ठेवा. एका कढईमधे तेल गरम करून कॉलीफ्लॉवरचे तुरे तळून घ्या. कुकरमध्ये एक टे स्पून गरम करून त्यामध्ये लवंग, हिरवे वेलदोडे, तमलपत्र, दालचीनी तुकडा, शहाजिरे, चिरलेला कांदा घालून दोन-तीन मिनिट परतून घ्या. त्यामध्ये आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट घालून एक [...]
↧