खुशखुशीत नाचणीच्या चकल्या: चकली म्हंटले की आपल्या तोंडाला पाणी येते. कारण तिची चटपटीत चव व छान कुरकुरेपणा. आपण ह्या आगोदर भाजणीच्या चकल्या, मुग डाळीच्या चकल्या, ज्वारीच्या पिठाच्या चकल्या अश्या नानाविध प्रकारच्या चकल्या पाहिल्या आहेत. आता नाचणीच्या चकल्या हा एक चकलीचा वेगळा प्रकार आहे. नाचणी मध्ये भरपूर प्रमाणात कँल्शीयम व प्रोटीन आहे. आजारी माणसासाठी नाचणी ही लाभदायक आहे. अशक्तपणा आला असेलतर नाचणीचे जरूर सेवन करावे. नाचणीचा अजून एक फायदा आहे तो म्हणजे जे डायट करतात त्यांनी नाचणीचे नियमित सेवन करावे त्यामुळे वजन घटते. नाचणीच्या चकल्या ह्या झटपट होणाऱ्या आहेत. भाजणीच्या चकलीला हा एक छान पर्याय आहे. बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट वाढणी: २०-२२ चकल्या साहित्य: २ कप नाचणी पीठ १/२ कप गव्हाचे पीठ १ टी स्पून लाल मिरची पावडर १ टे स्पून तीळ १/२ टी स्पून ओवा १/४ टी स्पून हिंग ३ टे स्पून तेल किंवा लोणी २ कप पाणी मीठ चवीने तेल चकली तळण्यासाठी Khushkhushit Nachni Chi Chakti कृती: एका जाड बुडाच्या भांड्यात पाणी, मीठ, लाल मिरची पावडर, हिंग, ओवा, व तेल एकत्र करून गरम करायला ठेवा. पाण्याला उकळी आली की त्यात नाचणीचे पीठ व गव्हाचे पीठ घालून मिक्स करून भांड्यावर झाकण ठेवून मंद विस्तवावर दोन मिनिटे ठेवा. मग विस्तव बंद करून १५ मिनिट तसेच भांडे झाकून ठेवा. नंतर उकड काढलेली [...]
↧