कुकुंबर कप: कुकुंबर कप हे आपण सालड ह्याला छान पर्याय आहे. कुकुंबर कप दिसायला सुद्धा आकर्षक दिसतात. घरी पाहुणे येणार असतील किंवा घरी पार्टी आहे तेव्हा हे नक्की बनवा. टेबलवर दिसायला सुंदर व चवीस्ट लागतात. अगदी कमी वेळात झटपट बनविला जाणारा पदार्थ आहे. कुकुंबर कप बनवताना काकडी, गाजर, स्वीट मक्याचे दाणे, कोबी किसून, टोमाटो चिरून, कांदा चिरून, डाळिंब दाणे, दही किंवा मियोनीज सॉस वापरला आहे. कुकुंबर कप हे अगदी पौस्टिक आहेत कारण ह्यामध्ये काकडी, टोमाटो, कोबी, मक्याचे दाणे, कांदा व दही आहे. लहान मुलांना हे नक्की आवडेल. करून बघा. परत छान थंड केले की उन्हाळ्याच्या दिवसात अगदीच मस्त लागते. बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट वाढणी: १२ बनतात Cucumber Cups Salad साहित्य: ३ मोठ्या आकाराच्या ताज्या काकड्या १ छोटे लाल चुटूक गाजर (किसून) १/२ कप कोबी ताजा (किसून) १/४ कप गोड मक्याचे दाणे (उकडून) १/४ कप टोमाटो (चिरून) २ टे स्पून कांदा (चिरून) १/२ कप डाळिंब दाणे १/२ टी स्पून जिरे पूड लिंबूरस, साखर, मीठ चवीने १/२ कप दही किंवा मियोनीज सॉस सजावटीसाठी कोथंबीर व लाल मिरची पूड कृती: प्रथम काकडी धुवून साले काढून त्याचे ३ इंचाचे गोल तुकडे करून घ्या. मग काकडी मधील गर काढून मोकळी जागा करा म्हणजे आपल्याला मोकळ्या जागेमध्ये सारण भरता येईल. गाजर, कोबी किसून घ्या, स्वीट कॉर्नचे [...]
↧