आंब्याचा पॅन केक: आंब्याचा पॅन केक हा लहान मुलांना नक्की आवडेल. आंबा घातल्यामुळे त्याचा रंगपण छान येतो. आमका पन केक हे नाव इंग्लिशमध्ये झाले मराठीत त्याला आपण आंब्याचे डोसे म्हणू शकतो. ह्या मध्ये बेकिंग पावडर वापरली आहे त्यामुळे छान छान क्रिस्पी होतात. मुलांना नाश्त्याला किंवा शाळेत जातांना डब्यात द्यायला पण छान आहेत. आंब्याच्या जूस पासून आपल्याला वेगवेगळे पदार्थ बनवता येतात त्यातील हा एक प्रकार आहे. The English language version of this Mango Dosa recipe preparation method can be seen here- Ambyacha Dosa बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट वाढणी: ७-८ मध्यम आकाराचे बनतात साहित्य: १/२ कप आंबा जूस १ कप गव्हाचे पीठ १ कप दुध १ कप पाणी ४ टे स्पून साखर मीठ चवीने १/४ टी स्पून बेकिंग पावडर वनस्पती तूप फ्राय करण्यासाठी Mango Pan Cake कृती: आंब्याचा रस, गव्हाचे पीठ, दुध, पाणी, साखर, मीठ मिक्स करून बेकिंग पावडर घालून मिक्स करा. नॉनस्टिक तवा गरम करून त्यावर एक टी स्पून तूप लावून १/४ कप मिश्रण तव्यावर घालून थोडेसे जाडसर पसरवावे. मग पॅन केकच्या कडेनी थोडेसे तूप घालून दोनी बाजूनी छान खरपूस भाजून घ्यावे. गरम गरम पॅन केक सर्व्ह करावे.
↧