Quantcast
Channel: royalchef.info
Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Tasty Jodhpuri Vegetable Pulao Recipe in Marathi

$
0
0
टेस्टी जोधपुरी व्हेजीटेबल पुलाव: जोधपुरी पुलाव हा सणावाराला किंवा इतर वेळी सुद्धा करायला छान आहे. हा पुलाव चवीस्ट लागतो. तसेच पौस्टिक सुद्धा आहे कारण की ह्यामध्ये भाज्या व ड्रायफ्रुट वापरले आहेत. मुलांना अश्या प्रकारचा पुलाव आवडतो. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: २ कप बासमती तांदूळ १ कप फुलकोबीचे तुकडे १/२ कप गाजर तुकडे १/२ कप बटाट्याचे तुकडे १/४ कप मटार चे दाणे १/२ कप दही ३ टे स्पून काजू=बदाम-किसमिस ६ खजूर तुकडे करून २ टी स्पून जिरे २ टी स्पून बडीशेप ३ टी स्पून किचन किंग मसाला मीठ चवीने १/४ कप कोथंबीर ३ टी स्पून तूप ८-१० पाने पुदिना २ टी स्पून आले-लसून (चिरून) Jodhpuri Vegetable Pulao कृती: प्रथम बासमती तांदळाचा मोकळा भात शिजवून घ्या. फुलकोबी, गाजर, बटाटे, मटारदाणे, अर्धवट वाफवून घ्या. एका कढईमधे तूप गरम करून त्यामध्ये जिरे व बडीशेप घालून मग चिरलेले आले=लसून घालून परतून घ्या. मग काजू, किसमिस, बदाम, व खजुराचे तुकडे घाला, अर्धा कप दही, मीठ किचन किंग मसाला, व मिरच्या उभ्या चिरून घालून परतून घ्या. मग वाफवलेल्या भाज्या घालून मिक्स करून एक वाग आणून बासमती तांदळाचा शिजवलेला भात हाताने मोकळा करून घालून मिक्स करून परतून घ्या. सर्व्ह करताना वरतून पुदिना व कोथंबीर घालून सजवून सर्व्ह करा.

Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Trending Articles