शक्रे पोंगल (खिरीचा दक्षिणात्य प्रकार) : ह्या आगोदर आपण बऱ्याच प्रकारचे खिरीचे प्रकार पाहिले शक्रे पोंगल ही एक दक्षिण विभागात बनवण्यात येणारी स्वीट डीश आहे. शक्रे पोंगल बनवतांना तांदूळ, मुगाची डाळ, चण्याची डाळ, गुळ व नारळ वापरला आहे. शक्रे पोंगल ही खीर जरी दक्षिण भागात बनवत असले तरी महाराष्टात सुद्धा लोकप्रिय आहे, बनवण्यासाठी वेळ: वाढणी: ४ जनासाठी साहित्य: २ कप तांद्ळ १/२ कप मुगाची डाळ १/४ कप चण्याची डाळ १ १/२ कप गुळ १ नारळ मीठ चवीने वेलचीपूड चवीने १ टे स्पून तूप शक्रे पोंगल (खिरीचा दक्षिणात्य प्रकार) कृती: मुगाची डाळ थोडी भाजून घ्या. चणाडाळ तांबूस रंगावर भाजून घ्या. नंतर तांदूळ, चणाडाळ, मुगडाळ व पुरेसे पाणी कुकरमध्ये घालून शिजवून घ्या. नारळ खोवून वाटून घ्या. तांदूळ व डाळी शिजल्यावर त्या घोटून घ्या. किंचित मीठ घालून व वाटलेला नारळ घालून त्यात आवडीप्रमाणे गुळ घालून परत शिजवून घ्या. शिजताना वेलचीपूड व तूप घालून मिक्स करून घ्या. गरम गरम शक्रे पोंगल सर्व्ह करतांना वरतून ड्रायफ्रुट ने सजवा.
↧