Quantcast
Channel: royalchef.info
Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Sweet Delicious Doodhi Recipe in Marathi

$
0
0
गोड दुधी: गोड दुधी ही एक जेवणानंतरची स्वीटडीश किंवा जेवतांना सुद्धा वाढता येणारी डीश आहे. ही डीश बनवतांना दुधी भोपळा, नारळाचे दुध, साखर, काजू व किसमिस वापरले आहे. दुधी भोपळा हा पौस्टिक आहे हे आपल्याला माहीत आहेच. मुले जर दुधीभोपळा भाजी खयचा कंटाळा करीत असतील तर अश्या प्रकारची दुधीभोपळा डीश बनवा नक्की सर्वजण आवडीने खातील. बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: १/२ किलो ताजा कोवळा दुधीभोपळा १ कप नारळाचे दुध १ कप साखर १५-२० काजू १/४ कप किसमिस मीठ चवीने १ टे स्पून तूप God Doodhi Bhopla कृती: दुधीभोपल्याची` साले काढून भोपळ्याच्या लहान-लहान चौकोनी फोडी कराव्यात. नारळाचे दुध काढून घ्या. काजूच्या पाकळ्या तुपावर बदामी रंगावर तळून घ्या. कढईमधे भोपळ्याच्या फोडी परतून वाफेवर शिजवून घ्या. शिजल्यावर नारळाचे दुध, मीठ व साखर व किसमिस घालून थोडे परतून घेवून शिजवून घ्यावे. गरम गरम सर्व्ह करतांना वरतून तळलेले काजू घालावे. अथवा आपण थंड करून सुद्धा वाढू शकतो.

Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Trending Articles