देह्रोरी (Dehrori) : देहोरी ही एक स्वीट डीश आहे. ती आपण सणावारी किंवा इतर दिवशी सुद्धा बनवू शकतो. देहोरी ही एक स्वीट डीश चवीस्ट व अगदी निराळी आहे. छत्तीसगढ़ मधील ही लोकप्रिय डीश आहे. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: ४ जनासाठी साहित्य: २ कप तांदूळ १ १/२ कप साखर ३/४ कप घट्ट दही २ टे स्पून तूप (पातळ) ५-६ केसर काड्या १/२ टी स्पून वेलचीपूड १ १/२ टी स्पून लिंबूरस तळण्यासाठी तूप बदामाचे काप गुलाब पाकळ्या सजावटीसाठी Delecious Sweet Dehrori कृती: तांदूळ स्वच्छ धुवून ३-४ तास भिजवून ठेवावे. त्यातील पाणी निथळून टाकून कोरडे करावे. व कापडावर पसरवून वाळवावे. २-३ तासा नंतर मिक्सर मधून जाडसर रवा असतो इतपत पावडर करून घ्या. तांदळाच्या रव्यात दही व वितळलेले तूप मिसळून घट्टसर मिश्रण बनवून रात्रभर झाकून ठेवून फर्मट होऊ द्यावे. पाक बनवण्यासाठी साखरेत १ कप पाणी घालून १ तारी पाक करावा. त्यात केसर काड्या, वेलचीपूड , व लिंबूरस मिसळावा. कढईमधे तूप गरम करून त्यात तांदळाच्या पीठाचे छोटे-छोटे गोळे सोडावे व तांबूस रंगावर खमंग तळावे. टिशू पेपरवर तळलेले गोळे पसरवून जास्तीचे तूप काढून टाकावे. तळलेले गोळे आता साखरेच्या पाकात ३-४ तास मुरु द्यावे. सर्व्ह करतांना वरून बदामाचे काप व गुलाब पाकळ्या घालून सजवावे.
↧