लाहोरी व्हेजिटेबल: लाहोरी व्हेजिटेबल ही एक छान जेवणातील चमचमीत भाजी आहे. अश्या प्रकारची भाजी आपण घरी पार्टीला किंवा कीटी पार्टीला बनवण्यासाठी मस्त आहे. आपल्या नेहमीच्या भाज्यांचा आपल्याला कंटाळा आला की आपण अश्या प्रकारची भाजी बनवू शकतो. लाहोरी व्हेजिटेबल ही भाजी बनवताना पनीर, काजू, मखणा, शिमला मिर्च, टोमाटो, खसखस व मसाला वापरला आहे. लाहोरी व्हेजिटेबल ही भाजी पराठा किंवा जीरा राईस बरोबर सर्व्ह करायला छान आहे. बनवण्यासाठी वेळ: वाढणी: ४ जणासाठी साहित्य: १/२ कप पनीर १/२ कप काजू १ टे स्पून मगज बी २ टी स्पून खसखस १ मोठा कांदा २ मोठे टोमाटो २ मध्यम आकाराच्या शिमला मिर्च १/२ कप मखाणा १ टे स्पून आले-लसून पेस्ट १ टी स्पून पंजाबी गरम मसाला १ टी स्पून किचन किंग मसाला २ टी स्पून धने-जिरे पावडर १ टी स्पून लाल मिरची पावडर १/४ कप फ्रेश क्रीम १/४ कप कोथंबीर पुदिना मीठ चवीने १ टे स्पून तेल व तूप Veg Lahori कृती: काजू तळून बाजूला ठेवा. ५-६ काजू, खसखस, मगज बी १ तास भिजत ठेवून मग बारीक वाटून घ्या. टोमाटो उकडून मिक्सरमध्ये वाटून घ्या. कांदा किसून घ्या. मखाणे तळून घ्या. कढईमधे तेल व तूप गरम करून त्यात आले-लसून पेस्ट परतून घ्या. मग त्यामध्ये किसलेला कांदा व मीठ घालून तेल सुटे परंत परतून घ्या. तेल सुटल्यावर [...]
↧