पंजाबी खमंग बटाट्याची भाजी: पंजाबी बटाट्याची भाजी ही बटाटे उकडून बनवली आहे. ही भाजी पराठ्याबरोबर टेस्टी लागते. ही भाजी बनवताना बटाटे उकडून घेतले व आले-लसून, कांदा, लाल मिरची पावडर, धने-जिरे पावडर व टोमाटो वापरला आहे. अश्या प्रकारची भाजी झटपट बनते जर कोणी पाहुणे येणार असतील तर अशी खमंग भाजी बनवा. ह्या भाजीसाठी तेल थोडे जास्तच लागते म्हणजेमग ती टेस्टी लागते. बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट वाढणी: ४ जनासाठी साहित्य: ३ मोठ्या आकाराचे बटाटे २ मध्यम आकाराचे बटाटे १ छोट्या आकाराचा टोमाटो १ टे स्पून आले-लसून पेस्ट २ टी स्पून लाल मिरची पावडर १/२ टी स्पून हळद १ टी स्पून ध्ये-जिरे पावडर मीठ चवीने १/४ कप कोथंबीर चिरून फोडणी करीता: २ टे स्पून तेल १/४ टी स्पून हिंग Khamang Punjabi Batata Bhaji कृती: बटाटे उकडून, सोलून, त्याच्या फोडी करून घ्या. कांदा, टोमाटो व कोथंबीर चिरून घ्या. आले-लसून पेस्ट बनवून घ्या. कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये हिंग घालून मग कांदा घाला. कांदा गुलाबी रंगावर परतून झाल्यावर आले-लसून व टोमाटो २ मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या. कांदा-आले-लसून परतून झाल्यावर लाल मिरची पावडर, हळद, धने-जिरे पावडर व मीठ घालून मिक्स करून बटाट्याच्या फोडी घालून मिक्स करून घ्या. कढईवर झाकण ठेवून चांगली वाफ येऊ द्या. सर्व्ह करतांना कोथंबीर घालून चपाती बरोबर किंवा पराठ्याबरोबर सर्व्ह करा.
The post Khamang Punjabi Batata Bhaji Recipe in Marathi appeared first on Royal Chef Sujata.