उत्तर हिंदुस्तानी लोणचे: उत्तर हिंदुस्तानी लोणचे हे झणझणीत आहे कारणकी ह्यामध्ये गरम मसाला वापरला आहे. हे लोणचे छान टेस्टी व खमंग लागते. लोणचे हा पदार्थ असा आहे की जगात कोणाला आवडत नाही अशी कोणीही व्यक्ती नसेल. आपण रेस्टॉरंटमध्ये गेलो किंवा पार्टीला किंवा लग्नाला प्रतेक ठिकाणी जेवणात लोणचे असतेच. आपण रोजच्या जेवणात सुद्द्धा त्यामुळे जेवणाला चव येते. प्रतेक प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने लोणचे बनवले जाते. उत्तर प्रदेशात लोणचे बनवतांना काळी मिरी, दालचीनी, लवंग, शहाजिरे वापरले आहेत तसेच लोणचे टिकवण्यासाठी व्हेनिगर वापरले आहे. बनवण्यासाठी वेळ : ४५ मिनिट वाढणी: ७५० ग्राम बनते साहित्य : ४ मोठ्या कैऱ्या मीठ चवीनुसार १/२ कप काळी मिरीची पावडर २ टी स्पून हिंग पावडर ८ तुकडे दालचीनी पावडर १ टी स्पून लवंग पावडर २ टी स्पून शहाजिरे तेल व व्हेनिगर आवश्क्तेनुसार Uttar Hindustani Kairi Che Lonche कृती : कैऱ्या धुवून, पुसून त्याच्या साली काढाव्यात. मिरे, हिंग दालचीनी, लवंग, व शहाजिरे याची बारीक पावडर करावी. मीठ व हळद प्रथम फोडीस चोळावे. त्याने जो खार सुटतो त्या खारात फोडी मंद शिजवाव्यात व त्यात वरील मसाल्याची पावडर घालावी आणि थंड झाल्यावर बरणीत भरावे. ह्या लोणच्याला वरून बेताने तेल गरम करून थंड झाल्यावर घालावे. व टिकावूपणासाठी फोडी बुडतील इतपत व्हेनिगर घालावा.
The post Uttar Hindustani Kairi Che Lonche Recipe in Marathi appeared first on Royal Chef Sujata.