कच्छी दाबेली: कच्छी दाबेली ही एक अगदी प्रतेक प्रांत्तात लोकप्रिय डीश आहे. ही डीश नाश्त्याला किंवा कोणी पाहुणे येणार असतील तर किंवा लहान मुलांच्या वाढदिवसाला बनवायला छान आहे. खर म्हणजे गुजरात मधील ही स्ट्रीट फास्ट फूड डीश आहे. ह्यामध्ये तिखट व आंबटगोड चटणी वापरली आहे. तसेच बटर मध्ये शालो फ्राय केली आहे त्यामुळे ह्याची चव अगदी न्यारीच लागते. ह्यामध्ये दाबेलीचा मसाला वापरण्याच्या आयवजी मी पावभाजी मसाला व चाट मसाला वापरला आहे व वरतून चीज घातले आहे त्यामुळे ह्याची चव अप्रतीम लागते. The English language version of this Fast Food Dish can be seen here – Recipe for Making Kacchi Dabeli at Home The video of this Kacchi Dabeli recipe can be seen on our YouTube Channel – https://www.youtube.com/watch?v=bYZN8zKmd-U बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: १ लादी पाव (८ पाव) २ मोठ्या आकाराचे बटाटे (उकडून, सोलून, किसून) १ छोट्या आकाराचा कांदा (चिरून) २ टे स्पून शेंगदाणे (भाजून, सोलून) २ टे स्पून डाळींब दाणे १/२ टे स्पून तेल १/२ टी स्पून चाट मसाला १ टी स्पून पाव भाजी मसाला १ टे स्पून हिरवी तिखट चटणी ३ टे स्पून चिंचेची आंबटगोड चटणी मीठ चवीने बटर पाव फ्राय करण्यासाठी चीज वरतून सजावटीसाठी Fast Food Stall Style Kacchi Dabeli कृती: बटाटे उकडून, सोलून, किसून [...]
The post Fast Food Stall Style Kacchi Dabeli Recipe in Marathi appeared first on Royal Chef Sujata.