Quantcast
Channel: royalchef.info
Viewing all articles
Browse latest Browse all 1150

१२ ग्रेट उपयुक्त कुकिंग टिप्स

$
0
0

१२ ग्रेट उपयुक्त कुकींग टिप्स: 12 Great Useful Cooking Tips ह्या १२ कुकिंग टिप्स फक्त छोट्या स्वयंपाका साठी नाहीतर मोठ्या प्रमाणात कुकिंग करणाऱ्यांना सुद्धा उपयुक्त आहेत. तुम्ही ह्या १२ कुकींग टिप्स वापरून बघा त्यामुळे तुमचा स्वयंपाक, भाज्या कश्या तुम्ही जास्त दिवस ठेवू शकाल तसेच त्याचा ताजेपणा व त्याचे व्हीटामीन सुद्धा कसे टिकवू शकाल. The English langauge version of the same article can be seen here – 12 Most Useful Cooking Tips १) जेव्हा आपण बीटरूट उकडून घेतो तेव्हा त्याची सर्व पाने काढून टाकतो ती न काढता १-२ पाने तशीच ठेवा त्यामुळे बीटरूट लवकर उकडले जाते. २) आपण जेव्हा गवार ( Cluster Beans), हिरवे ताजे मटार ( Green Peas) श्रावण घेवडा ( French Beans) कुकरमध्ये शिजवायला ठेवतो तेव्हा त्यामध्ये एक चिमुट मीठ घालावे त्यामुळे ह्या भाज्यांचा ताजेपणा व हिरवे पणा तसाच राहतो. Cooking Tips ३) आपण वांगे चिरतो व मग भांड्यात पाणी घेवून त्यामध्ये चिरलेले वांगे घालतो, तेव्हा त्या पाण्यात १/४ टी स्पून मीठ व १/४ टी स्पून हळद घालावी म्हणजे वांग्याच्या फोडी काळ्या पडत नाहीत. ४) जेव्हा आपण गवारची भाजी बनवतो तेव्हा त्यामध्ये तीळ भाजून कुटून घालावे. गवारच्या भाजीची चव निराळीच लागते. ५) आपण भाज्या चिरतो तेव्हा फार बारीक चिरू नये. कारण की बारीक चिरल्या तर त्यातील व्हीटामीन नष्ट होतात. [...]

The post १२ ग्रेट उपयुक्त कुकिंग टिप्स appeared first on Royal Chef Sujata.


Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Trending Articles