Quantcast
Channel: royalchef.info
Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Crispy Batata Pakoda Recipe in Marathi

$
0
0

बटाटा भजी पकोडे: पोट्याटोचे पकोडे किंवा भजी सर्वांना आवडतात. पावसाळ्याच्या सीझनमध्ये पाऊस पडत असतांना चहा बरोबर गरम गरम भजी बनवा. भजी पार्टीला, सणावाराला, इतर वेळी सुद्धा बनवता येतात. भजी बनवतांना बेसनमध्ये तांदळाचे पीठ, लाल मिरची पावडर, हळद, हिंग, ओवा-जिरे, कोथंबीर, मीठ व कडकडीत तेलाचे मोहन घातले आहे त्यामुळे भजी जास्त तेलकट होत नाहीत. सोडा वापरून भजी कुरकुरीत होतात पण तेल खूप लागते. त्या आयवजी गरम मोहन घाला व भजी बनवून बघा. हिरवी मिरचीची भजी बनवताना मिरची मधोमध चिरून त्यामध्ये थोडे विनेगर व मीठ लावून ठेवा मग भजी बनवा. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: २ मोठे बटाटे २ कप बेसन २ टे स्पून कडकडीत तेलाचे मोहन १ टी स्पून लाल मिरची पावडर १/४ टी स्पून हळद १/२ टी स्पून हिंग १ टे स्पून ओवा-जिरे भरड २ टे स्पून कोथंबीर चिरून मीठ चवीने तेल भजी तळण्यासाठी Crispy Batata Pakoda कृती: प्रथम बटाटे धुवून त्याची साले काढून पातळ गोल गोल चकत्या कापून घ्या. एका भांड्यात पाणी व मीठ घालून बटाट्याच्या चकत्या घाला. मग एका मोठ्या बाऊलमध्ये बेसन, तांदळाचे पीठ, लाल मिरची पावडर, हळद, हिंग, ओवा-जिरे जाडसर पावडर, कोथंबीर, मीठ घालून त्यामध्ये कडकडीत तेलाचे मोहन घालून मिक्स करा. मग थोडे थोडे पाणी घालत भज्याचे पीठ भिजवून घ्या. फार पातळ भिजवू नका. [...]

The post Crispy Batata Pakoda Recipe in Marathi appeared first on Royal Chef Sujata.


Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Trending Articles