मँगो कस्टर्ड: ही एक छान डेझर्ट रेसिपी आहे. मँगो हा फळांचा राजा आहे सर्वाना प्रिय आहे. त्याच्या पल्प पासून बनवलेला प्रतेक पदार्थ सुंदर स्वादीस्ट लागतो. एप्रिल मे महिन्यात फार गर्मी असते त्यामुळे आंब्याचे थंड बनवलेले पदार्थ मस्त लागतात. मँगो कस्टर्ड बनवताना प्रथम कस्टर्ड बनवून त्यामध्ये आंब्याचा पल्प घालून ब्लेंड करून आकर्षक ग्लासमध्ये सजवून थंड करून सर्व्ह करा. साहित्य: २ कप दुध २ टे स्पून वनिला कस्टर्ड पावडर २ टे स्पून साखर १ कप हापूस आंब्याचा पल्प २ टे स्पून फ्रेश क्रीम, ड्रायफ्रूट, द्राक्ष, डाळींब दाणे व २ टे स्पून हापूस आंब्याच्या फोडी सजावटीसाठी Chilled Mango Custard कृती: एका बाऊलमध्ये वनीला कस्टर्ड पावडर व १/२ कप दुध घालून मिक्स करून घ्या. आंब्याचा रस मिक्सरमध्ये ब्लेंड करून घ्या. एका जाड बुडाच्या भांड्यात बाकीचे राहिलेले दुध गरम करायला ठेवा. दुध गरम झाल्यावर त्यामध्ये कस्टर्ड मिक्स केलेले दुध घालून मंद विस्तवावर ५ मिनिट शिजवून घ्या. कस्टर्ड शिजलेकी त्यामध्ये साखर घालून मिक्स करून थंड करायला ठेवा. कस्टर्ड थंड झाल्यावर त्यामध्ये आंब्याचा पल्प व फ्रेश क्रीम घालून हँड मिक्सरने ब्लेंड करून घेवून डेकोरेटीव्ह ग्लासमध्ये कस्टर्ड घालून वरतून आंब्याच्या फोडी, ड्रायफ्रूट, द्राक्ष व डाळिंब दाणे घालून सजवून फ्रीजमध्ये दो तास थंड करायला ठेवा. मँगो कस्टर्ड थंड झाल्यावर मग सर्व्ह करा. The Marathi language recipe video of this [...]
The post Chilled Mango Custard Recipe in Marathi appeared first on Royal Chef Sujata.