टोमाटोचा गर कसा टिकवायचा: लाल लाल छान ताजे टोमाटो बघितले की आपले मन प्रसन्न होते. आपण असे टोमाटो घेऊन त्याचे नाना विध पदार्थ बनवत असतो. आमटी, भाजी, भात अश्या बऱ्याच पदार्थामध्ये आपण टोमाटो वापरतो. पण असे छान लाल टोमाटो आपल्याला नेहमीच मिळतील असे नाही तसेच आपल्याला वर्षभर टोमाटो लागत असतात. सीझनमध्ये मध्ये आपल्याला टोमाटो कमी किमतीत मिळतात. तेव्हाच जास्त टोमाटो घेवून त्याचा गर अथवा रस कसा टिकवून साठवता येईल ते बघू या, म्हणजे आपल्याला जास्त किमत मोजावी लागणार नाही. हा दाटसर टोमाटोचा रस चिकन अथवा मटणाचे पदार्थ बनवायला चांगला उपयोगी पडतो. Tomato आपल्याला जेव्हडे पाहिजे तेव्हडे लाल ताजे मोठ्या आकाराचे टोमाटो घ्या. सर्व टोमाटो स्वच्छ धुवून पुसून कोरडे करून घ्या. टोमाटोची साले व बिया काढून चिरून घ्या, एका जाड बुडाच्या भांड्यात चिरलेला टोमाटो घालून मंद विस्तवावर शिजत ठेवा. टोमाटो इतके शिजले पाहिजे की मलई सारखे घट्टसर झाले पाहिजे नंतर थंड करायला ठेवा. शिजलेले टोमाटोचा गर स्वच्छ कोरड्या केलेल्या काचेच्या बाटल्यांमध्ये भरून ठेवा व बाटलीचे झाकण झाकण घट्ट बंद करा. मग एका भाड्यात पाणी भरून गरम करून त्यामध्ये टोमाटोचा गर भरलेल्या बाटल्या ठेऊन मंद विस्तवावर २० मिनिट तसेच ठेवा. नंतर बाटल्या भांड्यातून काढून बाजूला ठेवा थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवा.
↧