बटाट्याची टिक्की अथवा बटाट्याचे पॅटीस: बटाट्याची टिक्कीही नाश्त्याला अथवा स्टारटर म्हणून बनवता येते. ह्या टिक्की पासून रगडा पॅटीस सुद्धा बनवता येते. मुलांना हा पदार्थ खूप आवडतो तसेच हा पदार्थ चटपटीत व खमंग लागतो. टिक्की बनवतांना उकडलेले बटाटे, आले-हिरवी मिरची पेस्ट, लिंबूरस, ब्रेडचा चुरा वापरला आहे. ब्रेडचा चुरा वापरल्यामुळे पॅटीस छान कुरकुरीत होतात. बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट वाढणी: ८-१० बनतात साहित्य: ४ मध्यम आकाराचे बटाटे ३-४ हिरव्या मिरच्या १/२” आले तुकडा १/२ टी स्पून लिंबूरस २ ब्रेड स्लाईस २ टे स्पून कोथंबीर (चिरून) २ टे स्पून पुदिना पाने (चिरून) मीठ चवीने तेल बटाट्याचे पॅटीस तळण्यासाठी Aloo Tikki Patties कृती: बटाटे उकडून, सोलून, किसून घ्या, हिरव्या मिरच्या व आले बारीक वाटून घ्या.ब्रेडचा चुरा करून घ्या. किसलेले बटाटे, हिरव्या मिरच्या-आले पेस्ट, ब्रेडचा चुरा, मीठ, लिंबूरस, कोथंबीर, पुदिना घालून मिक्स करून चांगले मळून घ्या. मग त्याचे एकसारखे ८-१० गोळे बनवून ते हाताने थोडे चपटे करा. नॉन स्टिक तवा गरम करून त्यावर थोडेसे तेल लावून सर्व पॅटीस लावून घ्या कडेने थोडे थोडे तेल घालून शालो फ्राय करून घ्या. गरम गरम बटाट्याची टिक्की टोमाटो सॉस बरोबर सर्व्ह करा.
↧