झटपट सोपे मशरूम शिमला मिरची सलाड रेसिपी: मशरूम सलाड हे बनवायला सोपे व झटपट होणारे आहे. हे सलाड बनवतांना मशरूम, शिमला मिरची (हिरवी, लाल, पिवळी), कांदा व मिरे पावडर वापरली आहे. ह्या आगोदर आपण सलाड चे बरेच प्रकार बघितले आता हा एक वेगळा प्रकार बघू या. मशरूमच्या सेवनाने आपल्या शरीराला बरेच फायदे होतात. ते एंटी-ऑक्सीडेंट आहेत. त्याच्या सेवनाने रोग प्रतिकारशक्ती वाढते. विटामीन “D” भरपूर प्रमाणात आहे. कार्बोहाइड्रेट्स कमी आहेत त्यामुळे आपल्या शरीराचे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. रक्तातील ब्लड शुगर लेवल बरोबर रहाते. मशरूमच्या सेवनाने अपचन, गैस, एसिडिटीचा त्रास होत नाही. मशरूमचे सेवन दर २-३ दिवसांनी करावे. मशरूम शिमला मिरची सलाड ह्या विडीओचे article आमच्या विडीओ Channelवर येथे पहा- https://www.youtube.com/watch?v=Xv7KgUeB3YM बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: २०० ग्राम फ्रेश मशरूम (स्लाईस करून) २ मोठे कांदे (उभे पातळ चिरून) १ मोठी शिमला मिर्च (उभी पातळ चिरून) १ कप लाल पिवळी शिमला मिरची (उभी पातळ चिरून) १ टी स्पून मिरे पावडर मीठ चवीने ३ टी स्पून तेल Jhatpat Mushroom Shimla Mirch Salad कृती: प्रथम मशरूम स्वच्छ धुवून उभे पातळ स्लाईस कापून घ्या. मग कांदा व शिमला मिरची उभी पातळ चिरून घ्या. एका कढईमधे थोडे तेल गरम करून प्रथम कांदा २ मिनिट परतून घ्या. खूप जास्त परतायचा नाही. मग कांदा बाजूला काढून [...]
The post Jhatpat Mushroom Shimla Mirch Salad Recipe in Marathi appeared first on Royal Chef Sujata.