महाराष्ट्रीयन पद्धतीने पारंपारिक दिवाळी फराळ खमंग चकली भाजणी पीठ कसे बनवायचे रेसिपी दिवाळी हा सण महाराष्टात खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतात. दिवाळी आली की आपण नाना प्रकारचे फराळाचे पदार्थ बनवतो. फराळ म्हंटले की खमंग कुरकुरीत चकली हवीच. छान कुरकुरीत स्वादीस्ट चकली बनवण्यासाठी चकली भाजणी पीठ कसे बनवायचे ते बघणार आहोत. खमंग कुरकुरीत चकलीची भजनी पीठ आपण घरी बनवू शकतो. चकली भाजणी बनवतांना तांदूळ, चणाडाळ, उडीदडाळ वापरली आहे. चकली भाजणी बनवण्यासाठी प्रथम तांदूळ, चणाडाळ व उडीदडाळ धुवून सावलीत वाळवून मग चांगली मंद विस्तवावर भाजुन मग बारीक दळून आणावे म्हणजे चकली छान खमंग बनते. बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट वाढणी: ३ ½ किलो ग्राम बनते साहित्य: २ किलो जाड तांदूळ १ किलो चणाडाळ १/२ किलो उडीदडाळ १०० ग्राम धने ५० ग्राम जिरे Traditional Maharashtrian Chakli Bhajani कृती: प्रथम तांदूळ निवडून स्वच्छ धवून कापडावर पसरवून घ्या. मग उडीदडाळ व चणाडाळ धवून कापडावर पसरून घ्या. मग घरात सावलीत २४ तास वाळत ठेवा. एक जाड बुडाची कढई गरम करायला ठेवा मग त्यामध्ये तांदूळ मंद विस्तवावर भाजून घ्या. त्यानंतर चणाडाळ व उडीदडाळ मंद विस्तवावर भाजून घ्या. तांदूळ व डाळी भाजताना जळता कामा नये. तांदूळ व डाळी भाजून झाल्यावर धने व जिरे भाजून घ्या मग सर्व थंड झाल्यावर गिरणी मधून बारीक दळून आणा. चकलीची भाजणी दळून आणल्यावर हवा [...]
↧




