कुरकुरीत पाकातले चिरोटे व टिप्स दिवाळी फराळसाठी चिरोटे ही महाराष्ट्रीयन लोकांची पारंपारिक डीश आहे. दिवाळी फराळ म्हंटले की आपण लाडू. चिवडा, चकली, शेव, शंकरपाळे बनवतो. चिरोटे ही एक दिवाळी फराळ मधील एक छान डीश आहे. चिरोटे हे बनवायला थोडे किचकट आहेत कारण त्यामध्ये चांगले पापुद्रे सुटायला पाहिजे म्हणजे ते टेस्टी लागतात.चिरोटे बनवताना चांगले पापुद्रे सुटण्यासाठी काही टिप्स आपण लक्षात घेतल्यानंतर आपले चिरोटे एकदम मस्त बनतात. तसेच दही घातल्यामुळे चिरोटेला छान आंबट गोड अशी चव येते. चिरोटे आपण पाकातील किंवा वरतून पिठीसाखर घालून सुद्धा सर्व्ह करू शकतो. चिरोटे कसे बनवायचे त्याचे साहित्य व कृती आपण आमच्या साईटवर येथे पाहू शकता: बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट वाढणी: २०-२२ बनतात साहित्य: २ कप मैदा २ टे स्पून तेल (कडकडीत मोहन) मीठ चवीने (चिमूटभर) १ टे स्पून दही तळण्यासाठी तेल अथवा वनस्पती तूप चिरोटे लाटण्याकरीता तांदळाची पिठी साटाकरीता: २ टे स्पून वनस्पती तूप पाक बनवण्यासाठी: २ कप साखर १/२ कप पाणी केशरी रंग किंवा केशर Kurkurit Pakatle Chirote कृती: मैदा व मीठ चाळून एका बाऊलमध्ये घ्या मग त्यामध्ये कडकडीत तेलाचे मोहन घालून मिक्स करून थोडे पाणी व दही घालून पीठ मळून घ्या. पीठ मळताना फार घट्ट मळू नका. साटा बनवण्यासाठी एका प्लेटमध्ये वनस्पती तूप घेऊन चांगले पांढरा रंग येई परंत फेटून घ्या. मग मळलेल्या पीठाचे [...]
↧