सर्वान साठी सहज करण्यात येणारे सोपे वास्तूशास्त्र उपाय स्वतःचे घर हे प्रतेकाचे एक स्वप्न असते. जेव्हा घर घ्यायचे तेव्हा आपल्या मनात नानाविध प्रश्न असतात. त्याच बरोबर घर घेतल्यावर त्याची पूजा कधी करायची किंवा गृह प्रवेश कधी करायचा ते आपण ठरवत असतो. तसेच घर घातल्यावर राहायला गेल्यावर सुधा आपण विचार करत असतो की आपले घर आपल्याला चांगले लाभावे त्यामध्ये सुख शांती रहावी. आपल्या घरात सुख शांती रहावी म्हणून काही सोपे छोटे छोटे उपाय जे समजले ते इथे शेअर करीत आहे. जेणेकरून आपले जीवन सुरळीतपणे चालावे. आजकाल आधुनिक युगामध्ये लोक अंधश्रद्धा म्हणतील पण आपण ह्यावर विश्वास ठेवून असे सोपे उपाय करून बघावे त्यानी आपल्याला फायदाच होईल काही नुकसान होणार नाही. वस्तू संबधी उपाय हे आपण सोपे आहेत ते आपण अगदी सहजपणे करू शकतो. आपल्या घरासाठी व सुखासाठी काही सोपे उपाय जे आपण सहज करू शकतो. Simple Vastu Shastra Tips for Everyone आपल्याला जर काही सोपे उपाय माहीत असतील तर ते जरूर शेअर करावे जेणेकरून त्याचा दुसऱ्याला सुद्धा फायदा होईल. वास्तू म्हणजेच आपले स्वतःचे हक्काचे घर जे आपण आपली आयुष्याची पुंजी लाऊन घेतो. तेव्हा आपण सगळ्या बाजूनी विचार करून मग घेतो. त्यासाठी काही माहिती थोडीफार देत आहे. आपण सर्व बाजूनी विचार करून जेव्हा घर घेतो तेव्हा महत्वाचा भाग म्हणजे वास्तुशांती.. आपल्याकडे असे म्हणतात [...]
↧