दिवाळी फराळसाठी महाराष्ट्रीयन स्टाईल इनस्टंट झटपट अनारसे अनारसे ही महाराष्ट्रीयन लोकांची लोकप्रिय व पारंपारिक डीश आहे. अनारसे हे बनवणे म्हणजे थोडे वेळ लागणारी डीश आहे. पूर्वीच्या काळी दिवाळी १५-२० दिवसावर आली की महिला अनारसे बनवण्यासाठी तीन दिवस तांदूळ भिजत घालून रोज त्यातील पाणी बदलत व नंतर खलबत्यात बारीक कुटून त्यामध्ये गुळ घालून परत आठ दिवस अल्युमिनियमच्या डब्यात किंवा कलई असलेल्या पितळी डब्यात दाबून ठेवायच्या व नंतर जेव्हडे पाहिजे तेव्हडे पीठ काढून अनारसे बनवायचे. पण आता कालांतराने व वेळे अभावी आपण इनस्टंट झटपट अनारसे बनवू शकतो. हे अनारसे सुद्धा छान कुरकुरीत लागतात व टेस्टी सुद्धा लागतात. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: १०-१५ बनतात साहित्य: २ वाट्या रवा १ वाटी खाण्याचा डिंक २ टे स्पून दही १ वाटी साखरेचा पाक (एक तारी) २ टे स्पून खसखस तूप अनारसे तळण्यासाठी Zatpat Anarsa for Diwali Faral कृती: रवा व दही चांगले मिक्स करून ३० मिनिट झाकून बाजूला ठेवा. डींक थोडा जाडसर कुटून घ्या. साखरेचा एकतारी पाक बनवायला ठेवा. मग भिजवलेला रवा व डींक मिक्स करून घेवून त्याचे छोटे छोटे पेढ्याच्या आकाराचे गोळे बनवून घ्या. पोळपाटावर खसखस घेऊन एक गोळा घेवून हलक्या बोटानी थोडा जाडसर थापून घ्या. खूप पातळ थापायचा नाही थोडा जाडसर थापायचा. पसरट कढईमधे किंवा खोलगट तवा घेवून तूप गरम करून त्यामध्ये एक [...]
↧