पनीर स्टीक्स: पनीर स्टीक्स ही एक स्टारटरची डीश आहे. आपण जेवणात किंवा नाश्त्याला बनवू शकतो. पनीर स्टीक्स छान टेस्टी लागतात तसेच बनवतांना पनीरच्या लांबट स्टिक कापल्या आहेत व वरतून उकडलेल्या बटाट्याचे आवरण लावले आहे. लहान मुलांच्या वाढदिवसाला किंवा कीटी पार्टीला बनवायला चागले आहे. The English language version of this Paneer Snack recipe and preparation method can be seen here – Paneer Sticks बनवण्यासाठी वेळ: ५० मिनिट वाढणी: ८-१० स्टिक साहित्य: १५० ग्राम पनीर (८-१० तुकडे) लांबट आकारामध्ये कापा) १) आवरणासाठी: ७-८ बटाटे (उकडून) २ लहान कांदे (बारीक चिरून) ३-४ हिरव्या मिरच्या (बारीक चिरून) २ टी स्पून आले-लसूण पेस्ट १ टी स्पून गरम मसाला २ टे स्पून लिंबूरस १/२ कप कोथंबीर (बारीक चिरून) २ ब्रेड स्लाईस मीठ चवीने २) आवरणासाठी: १/२ कप मैदा २ कप ब्रेडचा चुरा तेल पनीर स्टीक्स तळण्यासाठी Crispy Paneer Sticks कृती: पनीरचे लांबट आकाराचे ८-१० तुकडे करून घ्या. बटाटे उकडून सोलून किसून घ्या. कांदे, कोथंबीर बारीक चिरून घ्या. बटाट्यामध्ये चिरलेला कांदा, कोथंबीर, आले-लसूण पेस्ट, चिरलेल्या हिरव्या मिरच्या गरम मसाला, लिंबूरस, मीठ, ब्रेडचे स्लाईस थोड्याश्या पाण्यात भिजवून लगेच ब्रेड मधील पाणी दाबून काढा व उकडलेल्या बटाट्यामध्ये घालून एक सारखे मळून घ्या. मग मळलेल्या मिश्रणाचे ८-१० एक सारखे गोळे बनवा. प्रतेक गोळ्यामध्ये एक पनीर स्टिक घालून गोळा बंद करा. [...]
↧