चिकन स्पेगीटी:चिकन स्पेगीटी हा एक इटालियन नुडल्सचा प्रकार आहे. ही डीश बनवतांना मी चिकन खिमा वापरला आहे. आपण बोनलेस चिकन सुद्धा वापरू शकता. तसेच ह्या बरोबर वॉरसेस्टर सॉस वापरला आहे त्यामुळे ह्याची चव अप्रतीम लागते. ह्या इटालीयन डिशेश आता भारतात सुद्धा लोकप्रिय झाल्या आहेत. बनवण्यासाठी वेळ: 60 मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: २०० ग्राम स्पेगीटी सजावटीसाठी चीज (किसून) चिकन खिमा बनवण्यासाठी: २ टे स्पून बटर २ मोठा कांदा (चिरून) ६-७ लसूण पाकळ्या १२५ कप चिकन खिमा ७-८ मश्रूम १/२ कप टोमाटो प्युरी १/४ कप वॉरसेस्टर सॉस मीठ व मिरे पावडर चवीने २ मोठे टोमाटो (चिरून) साहित्य:वॉरसेस्टर सॉस बनवण्यासाठी: १/२ कप अँपल सीडर व्हेनीगर २ टे स्पून पाणी २ टे स्पून सोया सॉस १ टे स्पून ब्राऊन शुगर १ टी स्पून मस्टर पावडर १/४ टी स्पून कांदा पावडर १/३ टी स्पून दालचीनी पावडर मिरी पावडर चवीने सॉस बनवण्यासाठी एका भांड्यात सर्व साहित्य एकत्र करून १ मिनिट मंद विस्तवावर गरम करून घेऊन बाजूला थंड करायला ठेवा. Chicken Keema Spaghetti कृती: प्रथम वॉरसेस्टर सॉस बनवून घ्या. कांदा, टोमाटो व लसूण चिरून घ्या. मश्रूम थोडे मोठे तुकडे करून घ्या. कुकरमध्ये १ टे स्पून बटर गरम करून त्यामध्ये चिरलेला कांदा व लसूण २-३ मिनिट परतून घ्या. कांदा परतून घेतला की त्यामध्ये चिकन खिमा चांगला परतून [...]
The post Chicken Keema Spaghetti Recipe in Marathi appeared first on Royal Chef Sujata.